
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरात ‘रामकाल’ पथ विकास प्रकल्पाचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. या विकासकामांच्या अनुषंगाने, भाविकांची सुरक्षा आणि कामाचा वेग लक्षात घेता श्री काळाराम मंदिराचा मुख्य दरवाजा (पूर्व प्रवेशद्वार) तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय श्री काळाराम संस्थानने घेतला आहे.
विश्वस्त मंडळाचा निर्णय श्री काळाराम संस्थानच्या विश्वस्त मंडळाची बैठक २८ जानेवारी २०२६ रोजी पार पडली. या बैठकीत रामकाल पथ प्रकल्पाच्या कामकाजावर सविस्तर चर्चा करण्यात आली. हा प्रकल्प सार्वजनिक हिताचा आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने, नाशिक महानगरपालिकेला पूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पूर्व प्रवेशद्वार बंद ठेवण्यावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले.
दर्शनासाठी पर्यायी व्यवस्था मुख्य प्रवेशद्वार बंद असले तरी भाविकांच्या दर्शन व्यवस्थेत कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी संस्थानने घेतली आहे. मंदिराचे दक्षिण आणि उत्तर प्रवेशद्वार दर्शनासाठी नियमितपणे खुले राहणार आहेत. त्यामुळे सर्व भाविकांनी दर्शनासाठी या पर्यायी प्रवेशद्वारांचा वापर करावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रकल्पाचे काम पूर्ण होताच मुख्य (पूर्व) प्रवेशद्वार पुन्हा भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. भाविकांनी मंदिर प्रशासन आणि महानगरपालिका यांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री काळाराम संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
nashik kalaram temple main gate closed temporarily for ramkal path development
shree kalaram sansthan nashik has temporarily closed the east (main) entrance due to ramkal path project work. devotees can use north and south gates for darshan.
Keywords: kalaram temple nashik, ramkal path project, nashik municipal corporation, kalaram mandir news, nashik news, temple entry updates, ram kund nashik, darshan timings kalaram temple.



























































