
जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार वृष्टीमुळे या प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. रविवारी सार्यकाळी ६ वाजेपर्यंत जायकवाडीचा पाणीसाठा ८४.९० टक्क्यांवर पोहचला असून, कुठल्याही क्षणी या प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागणार आहेत, अशी परिस्थिती निर्माण आहे. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, अशा सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
अहिल्यानगर, नाशिक जिल्हयांत धो-धो पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्हयांतील नदी-नाल्यांना पूर आला आहे. शिवाय धरणेही ओव्हरफ्लो झाली आहेत. या जिल्ह्यांतील धरणे भरल्यामुळे पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. याचा परिणाम जायकवाडीत पाण्याची आवक वाढली आहे. जायकवाडी प्रकल्पामध्ये सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिवंत पाणीसाठा १८४३.०५२ दलघमी झाला असून, त्याची टक्केवारी ८४.९० पर्यंत पोहचली आहे. सद्यःस्थितीत ३२९३१ क्युसेकनी आवक सुरू आहे. ऊध्व प्रकल्पातून सध्या जायकवाडीत येणारी पाण्याची आवक पाहता जायकवाडी प्रकल्पाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडवावे लागणार आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे गोदावरी नदीत पाणी सोडल्यानंतर काही अनर्थ घडू नये यासाठी गोदाकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. नदीपात्रात काही तटस्नान, वाहने अथवा जनावरे असल्यास ते तत्काळ इतरत्र हलवावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
मोठ्या धरणांत ६१.८१ टक्के पाणीसाठा
राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असून, गेल्या चार दिवसांपासून या विभागात पावसाचा जोर वाढला आहे. विभागातील आहे. धो-धो पाऊस कोसळत असल्याने नद्यांना २३३ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली पूर आला आहे. त्यामुळे या विभागांतील धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली आहे. मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांत आजमितीला ६१.८१ टक्के पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा सकाळी ८ वाजेपर्यंतच आहे. धाराशिव जिल्ह्यातील सिना-कोळेगाव या मोठ्या धरणात अद्याप पाणीसाठा झालेला नाही. येथे शून्य टक्के पाणीसाठा आहे. नांदेडचे विष्णुपूरी धरण मात्र काठोकाठ भरले आहे.
जायकवाडीतील आवक घटली
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने या प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असताना दुपारी आवक घटली आहे. सकाळी जायकवाडीत ४६६१७ क्युसेकनी आवक सुरू होती. दुपारी ३ वाजेनंतर आवक घटली आहे. सध्या ३२९३१ क्युसेकने आवक सुरू आहे.




























































