दरवर्षी वाढत्या थंडीचा गैरफायदा घेत सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणाच घुसखोरी होते. त्यामुळे थंडीच्या काळात सुरक्षा दलांना अधिक सतर्क राहावे लागते. यंदाही थंडी वाढत असून सीमेपलीकडून घुसखोरीच्या हालचाली वाढत आहेत. सुमारे 150 दहशतवादी हिंदुस्थानात शिरत घातपात घडवण्याच्या प्रयत्नान असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली आहे. त्यामुळे सुरक्षा दल अलर्ट मोडवर आहे.
हिवाळा तोंडावर आल्यावर सीमेपलीकडून काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करण्याच्या कुरघोडी करण्यात येतात. मात्र, लष्कराचे जवान सतर्क असून दहशतवाद्यांचे सर्व कुरघोड्यांना प्रत्युत्तर देण्यात येईल, असे लष्कराकडून सांगण्यात आले. दहशतवाद्यांच्या संभाव्य घुसखोरीसंदर्भात गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाली आहे. दहशतवाद्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यासाठी लष्कराचे जवान सतर्क आहेत. हिंदुस्थानी सीमेजवळ घुसखोरीच्या तयारीत सुमारे 150 दहशतवादी असल्याची माहिती मिळाली आहे.
जम्मू कश्मीरमध्ये नुकत्याच निवडणुका यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. त्यामुळेही घुसखोरीचा धोका वाढला आहे. हिवाळा सुरू होण्यापूर्वी दहशतवादी अनेकदा घुसखोरीचे प्रयत्न करतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आम्ही सीमाभागावर बारीक लक्ष ठेवत आहोत, असे लष्कराकडून सांगण्यात आले.