सध्या हरयाणा आणि जम्मू कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आता निवडणूक आयोगाने हरयाणामधील मतदानाच्या तारखेत बल केला आहे. आता 1 ऑक्टोबरऐवजी 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर हरयाणा आणि जम्मू कश्मीरच्या मतमोजणीची तारीखही बदलण्यात आली आहे. आता 4 ऑक्टोबरऐवजी 8 ऑक्टोबरला दोन्ही राज्यात मतमोजणी होणार आहे.
निवडणूक आयोगाने मतदान आणि मतमोजणीच्या तारखेतील बदलाची माहिती दिली आहे. हरयाणामधील आगामी सणउत्सवांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. बिश्नोई समुदायाची जनता गुरु जम्बेश्वर यांच्या स्मरणार्थ आसोज अमावस्या साजरी करतात. त्यांच्या या परंपरेचा सन्मान करण्यासाठी निवडणूक आयोगाने तारखेत बदल केले आहे.