
शबरीमला मंदिरात झालेल्या सोन्याच्या चोरीप्रकरणी ईडीने शोध मोहीम सुरू केली आहे. ईडीने केरळ, कर्नाटक आणि तामीळनाडूमध्ये जवळपास 21 ठिकाणी छापेमारी केली आहे. बंगळुरूमधील मुख्य आरोपी उन्नीकृष्णन पोट्टी आणि त्रावणकोर देवस्वोम बोर्ड (टीडीबी) चे माजी अध्यक्ष ए. पद्मकुमार यांच्याशी संबंधित परिसरात ईडीकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे. या चोरीप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली असून आणखी तीन जणांची चौकशी केली जाणार आहे.

























































