Delhi Blast – दिल्ली स्फोटाचा तपास NIAकडे, गृहमंत्रालयाचा निर्णय

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाचा तपास गृहमंत्रालयाने NIAकडे सोपवला आहे. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला तर 24 हून अधिक जखमी झाले. याशिवाय स्फोटात आसपासच्या अनेक वाहनांनाही आग लागली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा (UAPA), 1967 च्या कठोर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस तपासात जम्मू-काश्मीर आणि हरियाणामध्ये आढळलेल्या जैश-ए-मोहम्मद (जेईएम) मॉड्यूलशी या स्फोटाचा संबंध जोडण्यात आला आहे. अलीकडेच या मॉड्यूलशी संबंधित अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली असून यात अनेक डॉक्टरांचा समावेश आहे. या छापेमारीत सुमारे 3000 किलो स्फोटके आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.