शेतकरी आंदोलनादरम्यानच अनेक हत्या आणि बलात्कार झाले; कंगना रणौतचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

भाजप खासदार कंगाना रणौत नेहमी वेगवेगळ्या वादामुळे चर्चेत असते. याआधी तिने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्याने वाद झाला होता. आता पुन्हा एकदा तिने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या विधानाने वाद पेटण्याची शक्यता आहे. देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच राज्यात घडलेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे जनमानसात प्रंचड रोष आहे. त्यातच कंगनाने केलल्या विधानाने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. शेतकरी आंदोलनादरम्यानच अनेक हत्या आणि बलात्कार झाल्याचे तिने म्हटले आहे. तिच्या या वक्तव्याबाबत सर्व सत्रातून संताप व्यक्त होत आहे.

शेतकरी त्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी आणि शेतमालाला हमी भाव मिळावा, यासाठी रस्त्यावर उतरले होते. सरकारने त्यांचे दिल्लीत येण्याचे रस्ते बंद केले होते. त्यांच्या रस्त्यात खिळे टाकण्यात आले होते. त्यांच्यावर गोळीबारही करण्यात आला होता. ही परिस्थिती देशाला माहिती आहे. तरीही कंगनाने शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ती म्हणाली की, शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होते, ते संपूर्ण देशाने बिघतले आहे. निषेधाच्या नावाखाली हिंसाचार पसरवला गेला. आंदोलनादरम्यान अनेक माणसे मारली गेली, अनेक बलात्कार झाले. सरकारने कृषी विधेयक मागे घेताच या साऱ्यांना धक्का बसला. कारण त्यांची प्लॅनिंग खुप मोठी होती, असा विधान तिने केले आहे. त्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने हे वक्तव्य केले आहे.

सध्या पंजाबमध्ये ड्रग्ज माफिया, धर्मांतर करणाऱ्या टोळ्या आणि फुटीरतावादी खलिस्तान समर्थक फोफावत आहेत. तिथे काही लोक नेहमीच कायदा हातात घेत आहेत, हे योग्य नाही. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. माझ्यावर हल्ला करुन माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही ती म्हणाली. महिलांची सुरक्षा हा माझ्यासाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. मी महिलांच्या सुरक्षेबाबत खूप गंभीर आहे आणि महिलांच्या समर्थनार्थ आवाज उठवते, असेही तिने सांगितले.