
गुजरातच्या साणंद येथे 3300 कोटी रुपयांचा केन्स सेमीकॉन प्लांटचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करण्यात आले. या प्लांटमध्ये दररोज 63 लाख चिप युनिट्सचे उत्पादन केले जाईल. या प्रोजेक्टमुळे गुजरातमधील हजारो तरुणांना रोजगार मिळेल. खास करून इंजिनीअरिंग क्षेत्रातील तरुणांना नोकरी मिळेल. मायक्रोन टेक्नोलॉजीनंतर केन्स सेमीकॉनचा प्लांट हिंदुस्थानातील सर्वात मोठा दुसरा प्लांट आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून गुजरातमध्ये अनेक मोठे प्लांट सुरू करण्यात आले आहेत. काही अन्य राज्यांतील प्लांट तर गुजरातमध्ये पळवून नेण्यात आले आहेत.




























































