लोकसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत जनतेने भाजपला चांगलाच दणका दिला आहे. भाजपने जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत विरोधकांवर दबावतंत्र वापरले, तसेच प्रभू श्रीरामांच्या नावानेही भाजपने मते मागितली. मात्र, भाजपचा खरा चेहला जनतेला समजला आणि जनतेने भाजपला नाकारल्याचे चित्र आहे. देशात ज्या ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामचे वास्तव्य होते, त्याच ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे. रामराज्यात भाजपचा पराभव झाला आहे, अशी आशयाची पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने करत भाजपवर निशाणा साधला आहे.
शरद पवार यांच्या पक्षाकडून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रभू श्रीरामांचं वास्तव्य भारतात ज्या ज्या ठिकाणी होतं त्याच ठिकाणी भाजपचा दारूण पराभव झाला आहे. ज्या भाजपने प्रभू श्रीरामांच्या नावाने मतांची झोळी भरण्याचा प्रयत्न केला, त्याच भाजपला संपूर्ण भारतात अपयश आलं. अशी पोस्ट करत त्यासोबत एक पोस्टर असून त्यात प्रभू श्रीरामांशी संबंधित स्थळे दाखवण्यात आली असून त्या लोकसभा क्षेत्रात भाजपचा पराभव झाला आहे, असे दाखवण्यात आले आहे.
प्रभू श्रीरामांचं वास्तव्य भारतात ज्या ज्या ठिकाणी होतं त्याच ठिकाणी भाजपचा दारूण पराभव झाला आहे. ज्या भाजपने प्रभू श्रीरामांच्या नावाने मतांची झोळी भरण्याचा प्रयत्न केला, त्याच भाजपला संपूर्ण भारतात अपयश आलं. pic.twitter.com/mzDq0KNyKZ
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 8, 2024