Naxal Encounter – झारखंडच्या सारंडा जंगलात चकमक, सुरक्षा दलांच्या कारवाईत 16 नक्षलवादी ठार

झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात सारंडा जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत वाँटेड नक्षलवाद्यासह एकूण 16 नक्षलवादी ठार झाले. किरीबुरू आणि छोटानाग्राह पोलीस ठाण्याअंतर्गत कुमडी भागात ही कारवाई करण्यात आली. कोल्हाणचे डीआयजी अनुरंजन किस्पोट्टा यांनी चकमकीची पुष्टी केली.

सेंट्रल कमिटी सदस्य अनल दा सह एकूण 16 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मृत नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. 203 व्या, 205 व्या, 209 व्या कोब्रा बटालियन आणि अनेक सीआरपीएफ बटालियनचे जवान या कारवाईत सहभागी आहेत. परिसरात सतत शोध मोहीम सुरू आहे. गुप्त माहितीच्या आधारे, सुरक्षा दलांनी सारंडा जंगलाला घेराव घालत जोरदार गोळीबार केला.