
पाषाणे धरणात चार तरुण बुडाल्याची घटना घडली असून यातील तीन जणांना वाचवण्यात सहकारी मित्राला यश आले आहे. मात्र 26 वर्षीय अजय रावत याचा रात्री उशिरा पर्यंत शोध लागला नाही. अंधार झाल्याने पोलिसांनी शोध मोहीम थांबवली असून सकाळी पुन्हा खोपोली येथील बचाव समितीची मदत घेणार आहे.
नवी मुंबईतील दिघा गाव येथील शिवभवन बिल्डींग मधील राहणारे रोजकुमार छाजलाना, हरेंदर सिंग, दिपक छाजलाना, आदित्य छाजलाना आणि अजय रावत हे पाच तरुण वांगणी पाषाणे येथील हिमालय गार्डन येथे मित्राकडे फिरण्यासाठी आले होते.