शेवटच्या दोन दिवसांत निवडणूक अधिकाऱ्यांचा घामटा निघणार; पाच दिवसांत दाखल झाली फक्त 29 नामनिर्देशन पत्रे

नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि पनवेल महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी गेल्या पाच दिवसांत सुमारे ११ हजार ३३० उमेदवारी अर्ज खरेदी केले असले तरी अद्यापपर्यंत फक्त २९ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक राहिले असून या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारताना निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक यंत्रणेचा अक्षरशः घामटा निघणार आहे.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत येत्या ३० डिसेंबरपर्यंत दिली आहे. ही मुदत २३ डिसेंबरपासून सुरू झाली. मात्र या कालावधीत हजारो उमेदवारांनी फक्त उमेदवारी अर्ज खरेदी केले. अर्ज खरेदीच्या तुलनेत भरण्याचे कमी राहिले आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक १११ जागांसाठी होत आहे. त्यासाठी चार पाच दिवसांत २ हजार ४९० उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे. अर्ज विक्रीच्या तुलनेत उमेदवारी अर्ज भरण्याचे प्रमाण फार कमी राहिले आहे. आतापर्यंत फक्त ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये कोपरखैरणे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील चार आणि नेरुळ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील दोन अजांचा समावेश आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी गेल्या पाच दिवसांत ३ हजार ५९९ उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे. त्यापैकी फक्त १३ उमेदवारी अर्ज आतापर्यंत दाखल झाले आहेत. ठाणे महापालिकेची निवडणूक ३३ प्रभागांमधून १३१ जागांसाठी होणार आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी निवडणूक आयोगाने शहरात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ९ कार्यालये तयार केली आहेत. गेले पाच दिवस या कार्यालयांतून फक्त अर्जाची विक्री झालेली आहे.

  • पनवेल महापालिका निवडणुकीसाठी गेल्या पाच दिवसांत ६ निवडणूक निर्णय अधिकान्यांच्या कार्यालयातून ८५० उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे. अद्यापपर्यंत एकही उमेदवारी अर्ज भरला गेलेला नाही. ही निवडणूक २० प्रभागांमधून ७८ जागांसाठी होत आहे.
  • मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत १ हजार ५७७ उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे. विक्री झालेल्या अर्जाच्या तुलनेत गेल्या पाच दिवसांत दाखल होणाऱ्या अर्जाची संख्या फार कमी आहे. आतापर्यंत फक्त ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, मीरा-भाईंदर पालिकेची निवडणूक २४ प्रभागांतून ९५ जागांसाठी होत आहे.
  • कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या पाच दिवसांत २ हजार ८१४ उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे. आतापर्यंत फक्त ५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. केडीएमसीची निवडणूक ३१ प्रभागांतून १२२ जागांसाठी होत आहे.

उमेदवार, कार्यकर्त्यांना प्रचार करण्यासाठी इमारतीत

ध्वनी आणि वायुप्रदूषणामुळे हैराण झालेल्या मीरा-भाईंदरमधील रहिवाशांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहराला भेडसावणारा हा प्रश्न राजकीय पदाधिकारी आणि महापालिका प्रशासन गांधीयनि घेत नसल्याने मीरा रोड येथील पूनम विहार भागात असलेल्या इंद्रप्रस्थ संकुलाने महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रचारासाठी नो एण्ट्री केली आहे. तसा फलक त्यांनी सोसायटीच्या प्रवेशद्वारावर लावला आहे. इंद्रप्रस्थच्या परिसरात एक हॉल तयार करण्यात आला असून तिथे लग्न समारंभ पार पडतात. या समारंभात रात्री उशिरापर्यंत बाजणारे बॅण्ड आणि होणारी फटाक्यांची आतषबाजी यामुळे येथील सर्वच कुटुंब अस्वस्थ झाले आहेत. कार्यक्रम असला की संकुलाच्या रस्त्यावर मोठ्या संख्येने वाहने पार्क केली जातात. याबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे ही प्रचारबंदी करण्यात आली आहे, असे सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण भाई आणि मीनाक्षी वाळणेकर यांनी सांगितले आहे.