अब की बार, बस कर यार! सिद्धूची मोदींवर पुन्हा टीका

696

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माजी क्रिकेटपटू आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अतिशय हीन पातळीवरील टीका केली आहे.

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले तर हिंदुस्थान संपला समजा, असे वादग्रस्त विधान सिद्धू यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटणार आहे. पंतप्रधान मोदींमुळे व्यापार संपला. तीन मोदी देश सोडून पळाले. चौथा खोटे बोलतोय. मोदींच्या राज्यात ना राम मिळाला, ना रोजगार असे बेताल ताशेरे सिद्धूंनी मोदींवर ओढले. ‘अब की बार बस कर यार’ असे सिद्धू म्हणाले. ते दिल्लीच्या तिलकनगर भागात बोलत होते. 12 मे रोजी दिल्लीच्या सात लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार असून त्यासाठी जोरात प्रचार सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या