
न्यू नेव्ही नगर येथील एपी टॉवर येथे तैनात अग्निवीराची दिशाभूल करत त्यांच्याकडील इन्सास रायफल, प्रत्येकी 20 जिवंत काडतुसे असलेल्या मॅगझीन असे शस्त्र चोरून दोघे भाऊ पळाले होते. यामुळे खळबळ उडाली होती. अखेर मुंबई गुन्हे शाखेने त्या दोघा भावांना तेलंगणा येथे पकडले. आरोपींकडून सर्व शस्त्रs हस्तगत करण्यात आली आहेत. यातील एक आरोपी स्वतः अग्निवीर म्हणून काम करत होता.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असताना संध्याकाळी 7.30 च्या सुमारास शस्त्र चोरीचे कांड घडले होते. कफ परेडच्या न्यू नेव्ही नगर येथील एपी टॉवर येथे तैनात असलेल्या अग्निवीर जवानाकडे एक अज्ञात व्यक्ती गेला. क्यूआरटीमधून आल्याचे सांगत त्या व्यक्तीने जवानाकडील इन्सास रायफल, प्रत्येकी 20 काडतुसांचे दोन मॅगझीन व एक रिकामी मॅगझीन स्वतःकडे लबाडीने घेऊन जवानाला हॉस्टेलला जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे अज्ञात व्यक्तीला क्यूआरटी जवान असल्याचे गृहित धरून त्याच्याकडे शस्त्र सोपवून जवान निघून गेला.
थेट तेलंगणा गाठले
जवानाकडील शस्त्र घेऊन आरोपी दुसऱ्याकडे देत असल्याचे व त्यानंतर दोघेही तेथून पसार झाले. गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम, उपायुक्त राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनशाम नायर, अरुण थोरात, स.पो.नि. अमोल माळी व पथकांनी तत्काळ तपास सुरू केला. मानवी काwशल्य व तांत्रिक बाबींच्या आधारे शोध घेतला असता आरोपी तेलंगणाच्या आसिफाबाद येथे सापडले. राकेश (22) आणि उमेश रमेश डुब्बुला (25) अशा दोघा भावांना पकडून आणले.
z दोघा भावांनी पद्धतशीर रेकी करून हे कांड केले होते, पण नौदलाच्या एपी टॉवरपर्यंत जाऊच कसे शकले, त्यांना सहज प्रवेश कसा मिळाला, असे अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. इतक्या मोठय़ा घटनेला नेमपं जबाबदार कोण, तेही स्पष्ट होऊ शकलेले नाही. आम्ही सखोल तपास करत असल्याचे पोलीस सांगतात.
घडय़ाळ विसरला आणि भांडापह्ड झाला
जवान हॉस्टेलच्या दिशेने जात असताना त्यांना हातात घडय़ाळ नसल्याचे आढळले. त्यामुळे ते पुन्हा एसटी टॉवरकडे माघारी गेले असता रायफल व काडतुसे घेणारा तेथे नसल्याचे आढळले. त्यांनी इतरत्र शोध घेतला तरी तो व्यक्ती मिळून आला नाही. त्यामुळे याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.