नक्षलग्रस्त भागात एक हजार दिवस उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मेहकरचे पोलीस उपनिरीक्षक गणेश भगवान कड यांना आज शासनाच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी विशेष सेवा पदक देऊन सन्मान केला.
हिंदुस्थान सरकारने 2021 मध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली व गोंदिया हे दोन जिल्हे नक्षलग्रस्त जिल्हे म्हणून घोषित केलेले आहे. या जिल्ह्यात तब्बल एक हजार दिवस सेवा बजावत असताना नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी दिलेल्या अधिकाराचा वापर करून सेवेचा कालावधी पूर्ण केल्याबद्दल राज्यातील 1148 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातुन हा मान मेहकरचे पोलीस उपनिरीक्षक गणेश भगवान कड यांना मिळाला. आज स्वातंत्र्य दिनी बुलढाणा येथे पोलीस अधिक्षक सुनील कडासने यांनी गणेश कड यांना हे पदक बहाल केले. यावेळी अप्पर पोलीस अधिकारी बी.बी.महामुनी सुद्धा उपस्थित होते. या सन्मान बद्दल गणेश कड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.