मणिपूरच्या थोबल जिह्यातून 14 नक्षलवाद्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूरमधील थोबल जिह्यातून बंदी घातलेल्या युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (यूएनएलएफ-कोइरेंग) या संघटनेच्या 14 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सोमवारी या अटकेची माहिती दिली. पोलिसांनी रविवारी नोंगपोक सेकमाई क्षेत्रातील हाओखोंग परिसरातून या सर्वांना पकडले होते. शोध मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांकडून मोठा दारूगोळा, दोन इन्सास रायफल, आठ इन्सास एलएमजी मॅगजीन, पाच इन्सास रायफल मॅगजिन आणि 100 काडतुसे जप्त करण्यात आली होती. याशिवाय, पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख रुपये रोख, पाच हेल्मेट जप्त केले आहेत. या नक्षलवाद्यांसंबंधित आणखी काही माहिती मिळतेय का? याचा तपास पोलीस करत आहे.