अंधेरी आणि जोगेश्वरी रेल्वे स्थानकाकडून पीएमजीपी कॉलनी, समर्थ नगर आणि मजास आगार येथे येणाऱया बसेसची संख्या कमी करण्यात आल्यामुळे दिवसाला या मार्गावरून प्रवास करणाऱया शेकडो प्रवाशांची गैरसोय होत होती. यासंदर्भातील अनेक तक्रारी प्रवाशांनी शिवसेनेकडे केल्या होत्या. शिवसेनेच्या दणक्यानंतर उद्यापासून या मार्गावरील बसची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे शेकडो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
अंधेरी आणि जोगेश्वरी रेल्वे स्थानकाकडून पीएमजीपी का@लनी, समर्थ नगर आणि मजास आगार येथे येणाऱया बसमार्ग क्रमांक 264, 441 आणि 442 ची संख्या कमी केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांना होणाऱया त्रासाबाबत जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे विधानसभा संघटक माजी नगरसेवक अनंत नर आणि विधानसभा पदाधिकारी यांनी मजास आगाराचे व्यवस्थापक देशपांडे यांची आज भेट घेऊन नियमित बस वाढविण्यासंदर्भात चर्चा केली. शिवसेनेच्या मागणीला यश आले असून उद्यापासून बसची संख्या वाढविण्यात येईल, असे आश्वासन सहाय्यक आगार व्यवस्थापकांनी दिले. यावेळी विधानसभा समन्वयक रवींद्र साळवी, उपशाखाप्रमुख शरद चव्हाण, शैलेश बांदेलकर, गटप्रमुख प्रताप दळवी, प्रदीप मुणगेकर, महेश टुकरूल, मिलिंद बागकर आदी उपस्थित होते.