राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा पटेल नाही, राज ठाकरे यांचं ट्वीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा पटेल नाही, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. X वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर राज ठाकरे यांचा रोक आहे. आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. यानंतर राज ठाकरे यांनी ही पोस्ट केली आहे.

X वर पोस्ट करत राज ठाकरे म्हणाले आहेत की, “महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही.”