
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना शनिवारी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. छातीत कफ साचल्याने आणि श्वास घेण्यास अडचण होत असल्याने 9 फेब्रुवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 5 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असला तरी पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
#WATCH | Maharashtra: NCP-SCP chief Sharad Pawar leaves from Ruby Hall Clinic in Pune after being discharged. He was admitted here on February 9, after complaints of cough and difficulties in breathing.
The hospital says, “The medical team has advised him to take adequate rest… pic.twitter.com/UT6huSpCoX
— ANI (@ANI) February 14, 2026
तत्पूर्वी शनिवारी सकाळी रुबी हॉस्पिटलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेझ ग्रँट माध्यमांना शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. शरद पवार यांच्या छातीमध्ये थोडा संसर्ग झाला होता. पण आता त्यांची तब्येत चांगली असून ते आज घरी जाणार आहेत याचा आम्हाला आनंद आहे. तासाभरात त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. चार-पाच दिवस त्यांना आरामाचा सल्ला देण्यात आला असून त्यानंतर ते बाहेर पडू शकतात, असे डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी सांगितले.
Official update from Ruby Hall Clinic, Pune | Dr. Purvez Grant Cheif Cardiologist, Chairman & Managing Trustee, Ruby Hall Clinic, stated that Sharad Pawar is in good health and has recovered well.
He will be discharged today. The medical team has advised him to take adequate… pic.twitter.com/9iQp2Q4Ev2
— ANI (@ANI) February 14, 2026
सुप्रिया सुळे यांचे ट्विट
शरद पवार यांची तब्येत बरी असून त्यांना डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे. त्यांना तीन चार दिवस आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानुसार ते घरीच आराम करणार असून त्यानंतर ते आपल्या दैनंदिन कामास सुरुवात करतील, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स पोस्ट करून दिली.
आदरणीय पवार साहेब यांची तब्येत बरी असून त्यांना डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे. त्यांना तीन चार दिवस आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानुसार ते घरीच आराम करणार असून त्यानंतर ते आपल्या दैनंदिन कामास सुरुवात करतील. साहेबांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल…
— Supriya Sule (@supriya_sule) February 14, 2026



























































