मोदी, बायडेन यांच्या संभाषणात बांगलादेश नव्हताच; एनडीए सरकारच्या बनवाबनवीचा पर्दाफाश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनच्या दौऱ्यावरून आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि युक्रेनमधील परिस्थितीबद्दल चर्चा केली. त्याचबरोबर बांगलादेशात अल्पसंख्याक आणि हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा मुद्दाही उपस्थित केला. याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांबद्दल मोदी आणि बायडेन यांनी तीव्र चिंता व्यक्त केल्याचे म्हटले आहे, मात्र आता अमेरिकेच्या प्रसिद्धीपत्रकाने एनडीए सरकारच्या बनवाबनवीचा पर्दाफाश केला आहे. कारण, या प्रसिद्धीपत्रकात याबाबतचा उल्लेखच नाही. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंचा विषय निघाला की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेले हल्ले रोखण्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी विरोधकांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने मोदी आणि बायडेन यांच्या संभाषणाचा हवाला देत बांगलादेशातील हिंदूंचा विषय त्यात घुसवला का? असा सवालही केला जात आहे.