करण जोहरच्या कुटुंबात नव्या पाहुण्याचे आगमन

करण जोहरने नुकतेच सोशल मीडिया इन्स्टाग्रावर काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या माध्यमातून त्याने, त्याच्या कुटुंबातील नव्या पाहुण्याचे स्वागत केले आहे. बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या चाहत्यांना त्याच्या कुटुंबातील एका नवीन सदस्याची ओळख करून दिली. हा नवीन सदस्य श्वान असून, त्याने त्याचे नाव नगेट जोहर असे ठेवले आहे.

करणने इंस्टाग्रामवर नगेटसोबत त्याच्या मुलांचे फोटो शेअर केले आणि कॅप्शन दिली, “ती गेल्या ६ महिन्यांपासून आमच्यासोबत आहे आणि तिने आम्हाला खूप आनंद आणि खूप प्रेम दिले आहे… आम्हाला तुम्हाला आमच्या कुटुंबातील नवीन सदस्याला भेटवायचे आहे… #NuggetJohar.” चाहते आणि सेलिब्रिटींनी नगेटचे कौतुक केले आणि तिला गोंडस म्हटले आहे.

अभिनेता वीर पहाडियाने लिहिले, ‘नगेट आणि मोमो हे चांगले मित्र आहेत’, अर्जुन बिजलानी, झोया अख्तर आणि महीप कपूर यांनी रेड हार्ट इमोजीचा वर्षाव केला. रवीना टंडनने लिहिले, ‘खूप गोंडस.’ अनन्या पांडेने लिहिले, ‘बेस्ट’ आणि सुवीर सरन यांनी लिहिले, ‘किती मौल्यवान तीन रत्ने.’ आणि ते भाग्यवान आहेत की त्यांना तुमच्यासारखा कोणीतरी मिळाला आहे.

करण जोहर ‘द ट्रेटर्स’ हा नवीन रिअॅलिटी शो होस्ट करणार आहे. हा शो 12 जूनपासून अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित होईल. हा शो नेदरलँड्सच्या ‘डी व्हेराडर्स’ या रिअॅलिटी शोची आवृत्ती आहे. यात 20 सेलिब्रिटी स्पर्धक असतील. या शोमध्ये महीप कपूर, आशिष विद्यार्थी, करण कुंद्रा, राज कुंद्रा, उर्फी, रफ्तार आणि जास्मिन भसीन दिसणार आहेत. राजस्थानातील जैसलमेर येथील एका भव्य राजवाड्यात हा शो चित्रित करण्यात आलेला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)