
अॅपलचा आगामी ‘आयफोन 17 प्रो मॅक्स’ हा फोन मोठा धमाका करणार आहे. या फोनची बॅटरी आतापर्यंतची सर्वात दमदार बॅटरी असेल, अशी माहिती समोर आली आहे. येत्या 9 सप्टेंबर रोजी आयफोन 17 ची नवी सीरिज लाँच होणार आहे. त्यात प्रो मॅक्सचा समावेश आहे. लाँचिंगच्या आधीच प्रो मॅक्सच्या काही फीचर्सची माहिती लीक झाली आहे. त्यानुसार, आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये 5,000 एमएएच पेक्षाही जास्त क्षमतेची बॅटरी असेल. सध्याच्या मॉडेल्समधील बॅटरीच्या तुलनेत ही क्षमता प्रचंड मोठी आहे.



























































