
राजस्थानची 22 वर्षीय मनिका विश्वकर्मा ही मिस युनिव्हर्स स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करत आहे. तिचे सौंदर्य आणि स्टाइलची सध्या जोरदार चर्चा असून या स्पर्धेत तिचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. येत्या 21 नोव्हेंबरला मिस युनिव्हर्सची फायनल असून जगाला नवी मिस युनिव्हर्स त्याच दिवशी मिळणार आहे. या स्पर्धेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धेत एकूण 120 देशातील सौंदर्यवतींनी सहभाग घेतला आहे. हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणारी मनिका विश्वकर्माने याआधी मिस युनिव्हर्स राजस्थान 2024 चा मुकुट जिंकला आहे. त्यानंतर तिने 2025 मध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स इंडियाच्या मुकुटावरही आपले नाव कोरलेय. आता संपूर्ण देशाच्या नजरा मनिकावर लागल्या आहेत. मिस युनिव्हर्सचा मुकुट जिंकून हिंदुस्थानचे नाव उज्ज्वल करण्याची संधी मनिकाकडे आहे.


























































