नवीन कर प्रणाली… पॅन कार्ड ते एटीएमपर्यंत नियम बदलणार; उद्यापासून खिशाला कात्री, डोक्याला ताप!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असून नवीन कर प्रणाली लागू करण्यात येणार आहेत. याशिवाय बँकिंग, गॅस, प्रवास आणि दैनंदिन खर्चाशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम दैनंदिन खर्चावर होणार असल्याने ग्राहकांचा खिसा खाली होणार आहे. या नवीन कर प्रणालीमध्ये वार्षिक उत्पन्न 12 लाखांपर्यंत असलेल्या नागरिकांना मोठी सवलत दिली असून त्यांना कर भरावा लागणार नाही.

पॅन कार्ड ः  पॅन कार्ड मिळवण्याचे नियमही कडक होणार आहेत. आधार कार्डसह 10 वीची गुणपत्रिका किंवा पासपोर्ट यांसारखी कागदपत्रे आवश्यक असतील.

फॉर्म 16 ः आतापर्यंत वापरलेले फॉर्म 16 आणि 16ए 1 एप्रिलपासून फॉर्म 130 आणि फॉर्म 131 द्वारे बदलले जातील.

एटीएम ः नव्या नियमांनुसार 5 ट्रान्झॅक्शननंतर प्रत्येक वेळी 23 रुपये द्यावे लागतील. दरम्यान, काही बँका अयशस्वी व्यवहारांवर दंड आकारणार आहे.

बँक ः पंजाब नॅशनल बँकेने डेबिट कार्डसाठी दररोज पैसे काढण्याची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 50 हजार ते 75 हजार रुपये केली आहे.

ट्रेन ः ट्रेनचे तिकीट प्रवासाच्या 8 तास आधी रद्द केल्यास परतावा मिळणार नाही.

गॅस ः घरगुती एलपीजी सिलिंडरसह सीएनजी, पीएनजी आणि एव्हिएशन फ्युएलच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे. इंधनाचे दरही वाढण्याची शक्यता आहे.