
ऍपलने आयओएस 26.0.1 चे नवीन अपडेट जारी केले आहे. आयफोन युजर्सला हे अपडेट तत्काळ अपडेट करण्याची सूचना कंपनीने दिली आहे. या अपडेटमधून काही महत्त्वाचे बग फिक्स करण्यात येणार आहेत. आयफोन 17 सीरिज लाँच केल्यानंतर काही आयफोन युजर्सकडून तक्रारी आल्या होत्या की, आयओएस 26 अपडेट केल्यानंतर फोनची बॅटरी लवकर संपत आहे. काही आयफोन 17 सीरिजमध्येही अडचण येत होती, परंतु नव्या अपडेटनंतर व्हायफाय आणि ब्लूटूथ फिक्स करण्यात आले आहेत. सेल्युलर नेटवर्क इश्यू आता फिक्स करण्यात आला आहे. कॅमेरा आर्टिफॅक्ट बगचा इश्यूही फिक्स करण्यात आला आहे. फोटो क्लिक केल्यानंतर व्हिज्युअल ग्लिचेज येत होते. काही युजर्सला फोनवर ऍप आयकॉन ब्लँक दिसत होते. तेही आता दिसणे बंद झाले आहे. नव्या अपडेटनंतर व्हाइसओव्हर ऑक्सिसिब्लिटीमध्ये येत असलेली अडचण दूर करण्यात आली आहे. या अपडेटमध्ये आवश्यक सिक्योरिटी पॅच दिले आहेत.