इंग्लंडला हरवण्याची किमया दाखवणाऱ्या वेस्ट इंडीज महिला संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध त्या पराक्रमाची पुनरावृत्ती साधता आली. अत्यंत थरारक सामन्यात वेस्ट इंडीजला शेवटच्या षटकात 15 धावा ठोकायच्या होत्या, पण अनुभकी सुझी बेट्सने विंडीजला केवळ सहाच धावा मोजल्या आणि न्यूझीलंडच्या अंतिम फेरी प्रवेशावर तब्बल 15 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शिक्कामोर्तब केले. आता महिला टी-20 वर्ल्ड कपला नवी जगज्जेती लाभणार असून न्यूझीलंड आणि दक्षिण आप्रिका हे संघ पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी भिडतील.
काल दक्षिण आफ्रिकेने आपल्या पराभवाची परतफेड करताना जगज्जेत्या ऑस्ट्रेलियन संघावर मात करत अंतिम फेरी गाठली. आज झालेल्या सामन्यात वेस्ट इंडीजकडून धक्कादायक विजयाची अपेक्षा होती. न्यूझीलंडच्या 129 धाकांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची आघाडीची जोडी हेली मॅथ्यूज आणि कियाना जोसेफ अपेक्षित सलामी देऊ न शकल्यामुळे ते मागे पडत गेले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी 15 षटकांत 5 बाद 72 अशी अवस्था केल्यानंतर विंडीज विजयापासून खूप दुरावला होता. मात्र तेक्हाच 16 क्या षटकात डिआंड्रा डॉटिनने ली ताहुहुला 3 षटकार खेचत पूर्ण सामनाच फिरकला. तसेच 18 क 19 क्या षटकांत 18 धावा फटकावत विंडीजने 114 धावांपर्यंत मजल मारली. शेवटच्या षटकात 15 धावांची गरज होती, पण विंडीजच्या शेपटाला केवळ 6 धावाच काढता आल्या. आघाडीच्या तीन फलंदाजांना टिपणारा एडन कारसन विजयाची शिल्पकार ठरली. त्याआधी सुझी बेट्स (26), जॉर्जिया प्लिमर (33), इसाबेला गेझ (20) यांच्या जोरावर न्यूझीलंडने 9 बाद 128 अशी मजल मारली होती.