
जोधपूरमध्ये हिंदुस्थानी वायुदलाची हवाहवाई!
हिंदुस्थानी वायुदलाचा सर्वात मोठय़ा युद्धाभ्यासाची ‘तरंग शक्ती 2024’ सध्या जोधपुरात पाहायला मिळत आहे. हिंदुस्थानसह 8 देशांतील वायुदल यात सहभागी झाले आहेत. वायुदलाचे जवान अत्याधुनिक लढाऊ विमानांसह एअर टू एअर आणि एअर टू ग्राऊंड कवायती दाखवत आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलियाचे फायटर जेट आकाशात आपली पॉवर दाखवत आहेत. हिंदुस्थानी जवानांनी फायटर जेटद्वारे आकाशात तिरंगा रेखाटला.
21 कंपन्यांनी विकले 35 हजार कोटींचे फ्लॅट
देशातील प्रमुख 21 कंपन्यांनी एप्रिल ते जून या तिमाहीत एकूण 35 हजार कोटी रुपयांच्या फ्लॅटची विक्री केली आहे. 21 प्रमुख रियल इस्टेट कंपन्यांनी 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत 34,927.5 कोटी रुपयांच्या फ्लॅटची विक्री केली. यात सर्वात जास्त गोदरेज प्रॉपर्टीजने जून तिमाहीत 8,637 कोटी रुपये, रियल्टी कंपनी डीएलएफ लिमिटेडने 6404 कोटी रुपये, मॅक्रोटेक डेव्हलपर्सने 4030 कोटी रुपये, गुरुग्राम येथील सिग्नेचर ग्लोबलने 3120 कोटी रुपयांची विक्री केली.
आठवडय़ाच्या आत शेअर्सची विक्री
आयपीओ खरेदी करणारे गुंतवणूकदार हे आयपीओ लागल्यानंतर अवघ्या आठवडय़ाभरात त्या आयपीओ शेअर्सची विक्री करतात. ही संख्या 54 टक्के असून जर परतावा चांगला मिळत असेल तर 68 टक्के शेअर्सची विक्री केली जाते, अशी माहिती मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या अभ्यासातून समोर आली आहे. आयपीओसाठी वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये एक बाब उघडकीस आली आहे.
तुर्कीत अमेरिकन सैनिकांवर हल्ला
तुकाaमध्ये दोन अमेरिकन सैनिकांवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. तुकाa युथ फेडरेशनने (टीजीबी) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. टीजीबीने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरही शेअर केला आहे. आम्ही यूएसएस वास्प या अमेरिकेच्या सर्वात मोठय़ा आक्रमण जहाजावर तैनात असलेल्या अमेरिकन सैनिकांवर हल्ला केला. सर्व 15 हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे.
द. आफ्रिकेत हनुमान चालीसा वाटणार
दक्षिण आफ्रिकेत एका प्रमुख हिंदू संघटनेने पुढील पाच वर्षांत 10 लाख हनुमान चालीसा वाटण्याचे लक्ष्य ठेवले आहे. छोटय़ा आकाराच्या हनुमान चालीसा वाटण्याची सुरुवात विष्णू मंदिरातील दान उत्सवातून सुरू करण्यात आली. संघटनेचे संस्थापक कंडित लूसी सिंगाबन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आध्यात्मिक विकास, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक संरक्षणाचा उत्सव साजरा करण्यासाठी हनुमान चालीसा वाटण्याचे ठरवले आहे.
मिवीचे सुपरपॉड्स ईयरबड्स लाँच
मिवी कंपनीने नवीन ट वायरलेस स्टिरियो सुपरपॉड्स ओपेरा टीडब्ल्यूएस ईयरबड लाँच केले. हाय रेंज वायरलेस ऑडिओचा पहिला ब्रँड आहे. यात 3डी साउंडस्टेज, मोठी बॅटरी लाइफ, ब्लूटूथ व्ही 5, मल्टी डिव्हाइस कनेक्टिविटी यासारखे जबरदस्त फीचर्स दिले आहेत. या ईयरबड्सची किंमत 2199 रुपये असून विक्री फ्लिपकार्ट, मिवीचे अधिकृत वेबसाइट आणि निवडक ऑफलाइन विक्रेत्याकडे सुरू करण्यात आली आहे.