नायजेरियामध्ये मंगळवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. राज्याच्या माजिया शहरात पेट्रोलने भरलेल्या टँकरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 94 लोकांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलने भरलेल्या टँकरची ट्रकला धडक बसणार होती. ती वाचविण्यासाठी चालकाने वेगाने टँकर बाजूला घेतला आणि त्यामुळे टँकर पलटी होऊन पेट्रोल पसरले. लोकांनी पेट्रोल गोळा करण्यासाठी गर्दी केली आणि भीषण स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला.
नायजेरियाच्या जिगावा राज्याच्या माजिया शहरामध्ये इंधनाच्या टॅंकरच्या स्फोटामुळे 94 लोकांचा मृत्यू झाला. यापैकी काहींचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर काहींचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला आणि काहींनी रुग्णालयात मृत्यू झाला. या स्फोटात 50 लोकांचा मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींमध्ये काहींची अवस्था गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नायजेरियाच्या मेडिकल असोसिएशनने डॉक्टरांकडून रुग्णांना पूर्णपणे मदत करण्याबाबत सांगितले आहे.