इस्त्रायली हल्ल्यात गाझातील महिला डॉक्टरची नऊ मुले ठार

इस्त्रायलने गाझा पट्टीतील खान युनूस शहरावर केलेल्या हल्ल्यात महिला डॉक्टरच्या 10 मुलांपैकी नऊ जण ठार झाले. हमासला लक्ष्य करण्याच्या इराद्याने इस्त्रायलचे गाझामधील हवाई हल्ले सुरूच आहेत. तेथील प्रमुख नासेर रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अला अल-नज्जर यांचा एक मुलगा आणि पती गंभीर जखमी झाले. सुदैवाने ते दोघे बचावले. संबंधित डॉक्टरच्या 11 वर्षीय जखमी मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली. इस्त्रायलने गेल्या 24 तासांत गाझात 100 हून अधिक ठिकाणी हल्ले केल्याचे त्यांच्या लष्कराने सांगितले. शनिवारी दुपारपर्यंतच्या 24 तासांच्या कालावधीत इस्रायली सैन्याने किमान 74 लोकांचा बळी घेतला, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले.