
उच्च दाबाच्या तारेला डीजेचा स्पर्श झाल्यामुळे विजेचा जबर धक्का बसून नऊ कावड यात्रेकरूंचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाले. बिहारमधील हाजीपूर येथे ही घटना घडली.
दरवर्षी श्रावण महिन्यात सोमवारी भाविक प्रचंड संख्येने कावड घेऊन हरिहरनाथ बाबाला जलाभिषेक करण्यासाठी जातात. रविवारी रात्री हाजीपूर येथून तरुणांचा जत्था कावडयात्रा घेऊन जलाभिषेकासाठी निघाला. सुलतानपूर गावात रात्री 12 वाजता डीजेचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श झाला. त्यामुळे डीजे असलेल्या वाहनात विजेचा प्रवाह उतरला आणि विजेचा धक्का बसून नऊ यात्रेकरूंचा मृत्यू झाला. या घटनेत सहा यात्रेकरू गंभीर भाजले असून हाजीपूरच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.