इतक्या संकटांचा मुकाबला कोणत्याही मुख्यमंत्र्याने केला नसेल! उद्धव ठाकरेंच्या कामाची अर्शद वारसीकडून प्रशंसा

5353

एकीकडे महाराष्ट्र कोरोनाशी झुंजत असतानाच निसर्ग वादळाचे संकट राज्यावर घोंघावायला लागलं. राज्यापुढे आलेल्या प्रत्येक संकटाला धीराने तोंड देत जनतेला सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अभिनेता अर्शद वारसी यानेही मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले असून त्याने म्हटलंय की ‘मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर लगेचच इतक्या मोठ्या संकटांचा सामना आजवर कुठल्याही मुख्यमंत्र्याला करावा लागला नव्हता.’

निसर्ग वादळाचा कोकण किनारपट्टीला असलेला धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला होता. यामध्ये त्यांनी नागरिकांनी काय करायला हवे आणि काय करू नये याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्री याच पद्धतीने कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करत असलेल्या महाराष्ट्राची नेमकी परिस्थिती काय आहे याची सातत्याने राज्यातील सगळ्या नागरिकांना माहिती देत असतात. अभिनेता अर्शद वारसीने बुधवारी एक ट्विट केलं ज्यात त्याने म्हटलं की “मला वाटत नाही की इतर कोणत्याही मुख्यमंत्र्याने कार्यकाळ सुरू होतक्षणीच इतक्या मोठ्या संकटांचा सामना केला असेल. पदभार सांभाळताच महामारीचे संकट उभे राहिले आणि आता वादळाचे” अशा आशयाचे ट्विट अर्शदने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या