मोदींच्या नेतृत्वात लढणे ही मजबुरी – निशिकांत दुबे

पंतप्रधान मोदींना भाजपची गरज नाही आहे, तर भाजपला मोदींची गरज आहे. 2029 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक मोदींच्या नेतृत्वाखाली लढणे ही भाजपची मजबुरी आहे, असे भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले. निशिकांत दुबे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदींचा चेहरा, त्यांचा राजकीय वारसदार आणि मोदींची निवृत्ती याबद्दल मोठे भाष्य केले. पुढील 15-20 वर्षे मोदी भाजपचे केंद्रीय नेते आणि मुख्य चेहरा राहतील, असा दावा दुबे यांनी केला.

योगींना दिल्लीत संधी नाही

मला तर पुढील 15-20 वर्षापर्यंत मोदीच नेते म्हणून दिसत आहेत, असे सांगत निशिकांत दुबे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिल्लीत संधी नसल्याचे स्पष्ट केले.

…तर भाजप 150 जागाही जिंकू शकत नाही

भाजप हा राजकीय पक्ष आहे आणि राजकीय पक्ष व्यक्ती चेहऱ्यावर चालतो, असे निशिकांत दुबे मोदींच्या निवृत्तीच्या मुद्द्यावर म्हणाले. जर मोदीजी आमचे नेते नसतील तर भाजप 150 जागाही जिंकू शकत नाही, असे दुबे म्हणाले.