भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी मिंधे सरकारला आणि विशेषकरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर दिला. विदर्भात 500-1000 कोटींची गुंतवणूक करायलाही कुणी तयार नाही, असे वास्तव मांडत त्यांनी सरकारच्या ‘गतिमान’ कारभाराची पोलखोल केली.
विदर्भात मोठी गुंतवणूक आणण्याचे बरेच प्रयत्न केले, पण हाती काहीच लागले नाही, असे नितीन गडकरी एका कार्यक्रमात म्हणाले. विदर्भात गुंतवणूक करायला गुंतवणूकदार तयार नाहीत. त्यामुळे इथे मोठे उद्योग येत नाहीत. इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक ट्रक ही भविष्यातील गरज आहे, पण तशी मोठी युनिट्स विदर्भात यायला तयार नाहीत, अशी खंत गडकरी यांनी व्यक्त केली.
भाजप केंद्रात आणि राज्यात दहा वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेत आहे. विदर्भातील अनेक नेते केंद्रात आणि राज्यात मंत्री आहेत. तरीही विदर्भात गुंतवणूकदार येत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे, पण स्वतःच्या विदर्भात काही विकास केला नाही.
विदर्भात गुंतवणूक करायला गुंतवणूकदार तयार नाहीत. त्यामुळे इथे मोठे उद्योग येत नाहीत. इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक ट्रक ही भविष्यातील गरज आहे, पण तशी मोठी युनिट्स विदर्भात यायला तयार नाहीत. – नितीन गडकरी