Video – मनसेचे नांदगांवकर शिवसेनेत

इतर पक्षातून शिवसेनेमध्ये येणाऱ्यांचा ओघ अजूनही कायम आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे. आपल्या धडाकेबाज आंदोलनांमुळे प्रसिद्ध असलेले नितीन नांदगांवकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. नांदगांवकर हे मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस होते.

नितीन नांदगांवकर यांनी 2 ऑक्टोबर म्हणजेच बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. 2010 पासून राजकारणात सक्रीय असलेल्या नांदगांवकर यांचे फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. प्रवाशांना नाडणाऱ्या रिक्षा तसेच टॅक्सीचालकांना वठणीवर आणायचे काम नांदगांवकर हे सातत्याने करीत आहेत. प्रामाणिक रिक्षा, टॅक्सी चालकांना त्रास होणार नाही याचीही ते खबरदारी घेत होते. त्यांचे फेसबुकवरील मुजोर, नियमभंग करणाऱ्या रिक्षा तसेच टॅक्सी चालकांना अद्दल घडवतानाचे व्हिडीओ बरेच व्हायरल झालेले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या