मोदींचे अच्छे दिन संपून वाईट दिवस सुरू झाले! मायावती यांची मोदींवर टीका

सामना ऑनलाईन । आझमगढ

नरेंद्र मोदी यांचे अच्छे दिन संपले असून वाईट दिवस सूरू झाल्याची टीका बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील प्रचारसभेत मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

दिवसेंदिवस महाआघाडीच जिकण्याची चिन्हे पहिल्या पाच टप्प्यांतील निवडणुकांमधून दिसून आल्याचेही मायावती यावेळी म्हणाल्या. सपा-बसपा-आरएलडीच्या युतीमुळे भाजपा नेत्यांची झोप उडाली आहे. मोदी आमच्या महाआघाडीला वारंवार महामिलावटी म्हणत आहेत. परंतु, स्वतः मोदीच महामिलावटी असल्याची टीकाही मायावती यांनी मोदी यांच्यावर केली. मतदार मोदींच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत. कारण आता मोदींचे वाईट दिवस आल्याची टीका मायावती यांनी यावेळी केली.

आपली प्रतिक्रिया द्या