
सामना प्रतिनिधी । गारज
पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी पाऊस न पडल्याने वैजापूर तालुक्यातील गारजसह परिसरातील गावांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
मनूर, भोकरगाव, पोखरी, बाभूळगाव, पाथरी, बायगाव, झोलेगाव, लाखणी, जांबरखेडा या गावांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. तर भटाणा, साकेगाव, मनेगाव, राहेगाव, भायगाव गंगा, धोंदलगाव आदीं गावांत तर पेरणीच झाली नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आधीच या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी पाऊस चांगला पडेल, या आशेने महागामोलाचे बियाणे घेऊन पेरणी केली. मात्र पावसाने डोळे वटारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.






























































