लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, हायकोर्टाने नाकारली दोषमुक्ती

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणायाला दोषमुक्ती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. विवाहाचे आमिष दाखवून केलेला अत्याचार का बलात्काराच असतो, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आरोपीला दोषमुक्ती देता येणार नाही, असे मावळ सत्र न्यायालयाने स्पष्ट केले. त्याविरोधात या आरोपीने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते.

न्या. अश्विन भोबे यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. दोषमुक्ती न देण्याचा मावळ सत्र न्यायालयाचा निकाल योग्यच आहे, असे न्या. भोबे यांनी नमूद केले.

दंडाची रक्कम केली कमी

दोषमुक्ती नाकारताना मावळ न्यायालयाने आरोपीला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम कमी करावी, अशी विनंती आरोपीने केली. ती मान्य करत न्यायालयाने दंडाची रक्कम 10 हजार रुपये केली.