
मुंबई महापालिकेच्या जलविभागाकडून ट्रॉम्बे उच्चस्तरिय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे बुधवार सकाळी 10 वाजल्यापासून ते गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत एम/पूर्व आणि एम/पश्चिम विभागातील चेंबूर, गोवंडी, देवनार, मानखुर्दमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तरी रहिवाशांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
एम/पूर्व विभाग
बीट क्रमांक 140 ते 146 – टाटानगर, गोवंडी स्टेशन मार्ग, देवनार म्युनिसिपल वसाहत (कॉलनी), गोवंडी, लल्लूभाई इमारत, जॉन्सन जेकब मार्ग (ए, बी, आय, एफ सेक्टर), एसपीपीएल इमारती, म्हाडा इमारती, महाराष्ट्रनगर, देवनारगाव रस्ता, गोवंडी गाव, व्ही. एन. पुरव मार्ग, बीकेएसडी मार्ग, दूरसंचार कारखाना परिसर, मंडाला गाव, मानखुर्द नौदल, संरक्षण क्षेत्र, मानखुर्द गाव, गोवंडी स्टेशन रोड, सी-सेक्टर, डी-सेक्टर, ई-सेक्टर, जी-सेक्टर, एच-सेक्टर, जे-सेक्टर, के-सेक्टर, कोळीवाडा ट्रॉम्बे, कस्टम रोड, दत्त नगर, बालाजी मंदीर मार्ग, पायलीपाडा चिता कॅम्प ट्रॉम्बे, देवनार फार्म रोड, बोरबादेवीनगर, बीएआरसी फॅक्टरी, बी.ए.आर.सी. वसाहत (कॉलनी), गौतम नगर, पांजरापोळ
एम/पश्चिम विभाग
बीट क्रमांक 152 व 153 – घाटला अमर नगर, मोती बाग, खारदेव नगर, वैभव नगर, सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तिक पार्क, सिद्धार्थ वसाहत (कॉलनी), लाल डोंगर, चेंबूर कॅम्प, युनियन पार्क.