
‘जगातली 8 युद्धे थांबवूनही मला नोबेल दिले नाही, आता माझ्याकडून जागतिक शांततेची अपेक्षा करू नका, असे म्हणणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 24 तासांतच घूमजाव केले. ‘‘मला नोबेलची पर्वा नाही, लोकांच्या जिवाची चिंता आहे,’’ असे ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांनी कालच नॉर्वेचे पंतप्रधान स्टोरे यांना खरमरीत पत्र लिहून नोबेल न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यावर स्टोरे यांनी खुलासा केला. ‘‘नोबेल पुरस्कार आमचे सरकार देत नाही. त्यासाठी स्वतंत्र समिती आहे. सरकार त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करत नाही,’’ असे स्टोरे म्हणाले. त्यानंतर ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘‘नोबेल कुणाला द्यायचा यात नॉर्वेची भूमिका नक्कीच आहे. त्यांचा संबंध नाही असे कोणी म्हणत असेल तर तो मोठा विनोद आहे,’’ असे ते म्हणाले.

























































