
नोरा फतेही-संजय दत्तचे ‘सरके चुनर तेरी…’ हे अश्लील गाणे यूटय़ुबवरून हटवण्यात आले आहे. ‘केडी – द डेव्हिल’ चित्रपटातील या गाण्यावर टीका होत आहे. या गाण्याविरोधात दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल झालेली आहे. हे गाणे लैंगिकतेला प्रोत्साहन देत असून समाजाची नकारात्मक प्रतिमा दर्शवते, असे तक्रारीत म्हटले होते. गाण्याचा गीतकार रकीब आलाम, दिग्दर्शक प्रेम, संगीतकार अर्जुन जन्या आणि गायिका मंगळी यांच्यावरही कारवाईची मागणी करण्यात आली. वादविवादानंतर गाण्याचे हिंदी व्हर्जन यूटय़ुबवरून काढून टाकण्यात आले.



























































