मंदिरांच्या जमिनीवर बांधलेल्या मशिदी मुस्लिमांनी स्वेच्छेने मोकळ्या कराव्यात, नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील, किती मारले जातील माहीत नाही, असे वक्तव्य कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजप नेते के.एस. ईश्वरप्पा यांनी पुन्हा केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मथुरेसह देशात आणखी दोन ठिकाणे अशी आहेत. जिथे न्यायालयाचा निर्णय आल्यावर आम्ही आमच्या मंदिरांचे बांधकाम सुरू करू. आमची मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदींना सोडले जाणार नाही. अशी एकही मशीद या देशात टिकणार नाही, अशी भाषा त्यांनी वापरली. मात्र हे माझे वैयक्तिक मत आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदींना आम्ही सोडणार नाही. देशात अशी एकही मशीद अस्तित्वात राहू देणार नाही. मी प्रतिज्ञा करेन की भारत हिंदू राष्ट्र होईल, असे ते यापूर्वी डिसेंबर 2023मध्ये कर्नाटकातील गदग येथे म्हणाले होते.