आधारकार्डवर आता फक्त फोटो आणि क्यूआर कोड

आधारकार्डवर असलेल्या खासगी माहितीचा दुरुपयोग टाळण्यासाठी आधारकार्डच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात येत आहे. आता आधारकार्डवर फक्त फोटो कॉपी आणि क्यूआर कोड असेल. इतर कोणतीही माहिती नसेल.
यूआयडीएआयचे सीईओ भुवनेश पुमार यांनी आधारसंदर्भातील एका कार्यक्रमात याबाबतचे संकेत दिले. ते म्हणाले, असे होऊ शकते की, भविष्यात आधारकार्डवर फोटो कॉपी आणि क्यूआर कोड एवढेच असेल. म्हणजे नागरिकांचे नाव, पत्ता, जन्मतारीख याची छापील माहिती त्यावर नसेल. भुवनेश पुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल, कार्यक्रम किंवा संस्थांमध्ये पडताळणीसाठी आधारकार्ड मागतात. नागरिकांच्या गोपनीय माहितीसाठी हे धोकादायक ठरत आहे. अनेक ठिकाणी आधारकार्डची फोटो कॉपी घेतली जाते आणि ते स्टोर केले जाते, हे नियमाविरुद्ध आहे. आधार कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीचा आधार नंबर किंवा बायोमेट्रिक ऑफलाईन तपासणीसाठी जमा केले जाऊ शकत नाही. यामुळे आधारकार्डचा दुरुपयोग होऊ शकतो. नियम आल्यानंतर या प्रकाराला आळा बसेल.

 आधारकार्डवर तपशीलवार माहिती देणे टाळावे, असा विचार यूआयडीएआय करत आहे.
 माहितीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून आधारकार्डवर फक्त फोटो आणि क्यूआर कोड असावा, जेणेकरून गरजेनुसार तो स्पॅन करताच योग्य माहिती दिसेल.
 नवीन क्यूआर कोड सर्व आवश्यक माहिती डिजिटल पद्धतीने पडताळेल. त्यामुळे फोटो कॉपी किंवा इतर कागदपत्रे साठवण्याची गरज राहणार नाही.
 प्रस्तावित बदलाचा उद्देश आधारचा वापर फक्त ओळखपत्र पडताळणीसाठी केला जाईल आणि वैयक्तिक माहितीचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होणार नाही.