आता चिन्ह धनुष्यबाण आहे; घड्याळ बंद पडले – जयदत्त क्षीरसागर

2153

लोकसभेच्या निवडणुकीत ढेकनमोहा परिसर मोठ्या ताकदीने उभा राहिला आहे. आता विधानसभेलाही तितक्याच ताकदीने उभे रहा. परिवर्तनासाठी ताकदीने साथ द्या पुढच्या पिढीचे भविष्य घडवायचे असेल तर विकास कामे करणे गरजेची आहेत. आता बाण हातात आहे, घड्याळ बंद पडले आहे, असे सांगून विरोधकांनी दुसऱ्याच्या उट्या काढत बसू नयेत विकासाची कामे करून दाखवावीत, असे आवाहन राज्याचे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.

 मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून  नवीन रस्ते कामांच्या आणि गोरक्षनाथ टेकडी येथील रस्ते सुधारणा कामांच्या एकूण चार कोटी 17 लक्ष रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते आज झाला. बीड तालुक्यातील गोरक्षनाथ टेकडी, ढेकणमोहा येथे झालेल्या या भूमिपूजन  समारंभास गोरक्षनाथ टेकडी देवस्थानचे ह.भ.प. नवनाथ महाराज, नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळक, जगदीश काळे, अरुण डाके,विलास बडगे, दिलीप गोरे, दिनकर कदम, गणपत डोईफोडे, अॅड. राजेंद्र राऊत, बप्पासाहेब घुगे, बालप्रसाद जाजू, अंकुश राठोड, अरुण बॉंगाणे, बाळासाहेब अंबुरे, सागर बहिर, नितीन धांडे, दिलीप भोसले , बाबासाहेब घुगे, मुन्ना फड सरपंच अरुण लांडे आदी उपस्थित होते.

यावेळी रोहयोमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ढेकणमोहा -कराळवाडी- निर्मळवाडी या 6.90 किलोमीटर लांबीच्या व 3 कोटी 99 लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन व फलकाचे अनावरण तसेच गोरक्षनाथ टेकडी येथे 18 लक्ष रुपये खर्चाच्या बीड परळी मार्ग ते गोरक्षनाथ टेकडी रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन  करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि शिवसैनिक हजर होते.

आपली प्रतिक्रिया द्या