आता एपीएमसीतून थेट पुण्याला चला सुसाट पामबीचवरील मार्गिकचे उ‌द्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एपीएमसीमधून पामबीच मार्गावरून पुण्याला आता सुसाट जाता येणार आहे. यापूर्वी पामबीच मार्गावरून मुंबई-पुणे महामार्गावर जाण्यासाठी वाहनचालकांना सानपाडा रेल्वे स्थानकापर्यंतच्या परिसराला वळसा घालावा लागत होता. मात्र पामबीच मार्गावरून थेट पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेला जोडणाऱ्या पुलाचे आज वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वाशी येथील सेक्टर १७ येथे पामबीच मार्गावरून पुण्याकडे जाण्याकरिता सायन-पनवेल महामार्गापर्यंत उड्डाणपुलाचे लोकार्पण आज राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आदी उपस्थित होते. या पुलाची उभारणी शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली आहे. उड्डाणपूल बांधकामाशी संबंधित कार्यकारी अभियंता पंढरीनाथ चौडे, उपअभियंता अमित पावरा, कनिष्ठ अभियंता रोहित पिंपळे तसेच वास्तुविशारद व कंत्राटदार यांच्या प्रतिनिधींचाही याप्रसंगी गणेश नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.