वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. उपोषणामुळे खालावलेली प्रकृती पाहून वडेट्टीवारांच्या डोळय़ात पाणी आले. पोषणस्थळावरूनच त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावला. सरकारने उपोषणकर्त्यांच्या भावना समजून घ्याव्यात, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे वडेट्टीवार मुख्यमंत्र्यांना म्हणाले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सरकारचे शिष्टमंडळ वडिगोद्रीत चर्चेसाठी येत असल्याचे सांगितले.