ओडिशामध्ये सरकारी आणि खासगी सेक्टरमध्ये काम करणाऱया महिला कर्मचाऱयांना मासिक पाळी काळात एक दिवसाची भर पगारी सुट्टी मिळणार आहे. स्वातंत्र्यदिनी ओडिशाच्या उपमुख्यमंत्री पार्वती परिदा यांनी ही घोषणा केली. कटक येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी महिलांना आनंदाची बातमी देत ही घोषणा केली. परंतु ही सुट्टी ऐच्छिक असेल. जर महिलांना वाटत असेल सुट्टी हवी तरच सुट्टी मिळणार आहे. ही सुट्टी सरकारी महिला कर्मचाऱयांसोबत खासगी पंपन्यांत काम करणाऱया महिलांनाही लागू असेल.