
मुंबईतील दहीहंडीचा उत्सव जगभरात पोहचला आहे. येथील थरावर थर रचण्याचा थरार आणि उत्साह असतो. शहरात अनेक ठिकाणी मानाच्या दहीहंडी आयोजित केल्या जातात. मुंबईतील मागाठाणे येथे आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची उपस्थिती होती. या दरम्यान सोनाली कुलकर्णीने मराठी माणसाबाबत महत्त्वाचं मत व्यक्त केलं आहे. अशा उत्सवातून मराठी माणसाने आपली संस्कृती जपली पाहिजे, असे ती म्हणाली. मुंबईतून मराठी माणसं संतत चालली आहे का, असा प्रश्न पडतो. पण आपली संस्कृती जपण्यासाठी आणि मुंबईत मराठी माणसं टिकवण्यासाठी आपण उत्सव साजारे करणे गरजेचं आहे, असेही ती म्हणाली.
मुंबईतली मराठमोळी दहीहंडी माझ्या नेहमी लक्षात राहणार आहे. समाजात ओळख मिळाल्यानंतर मी दहीहंडी उत्सवांना जाते. हा उत्सव कसा साजरा होतो ते पाहण्यास मिळतं. आपली संस्कृती टिकवायची असेल तर उत्सव अशाच पद्धतीने साजरे करायला हवेत. मराठी माणसांनी एकत्र येऊन आपली मराठी संस्कृती जपली तरच ती पुढच्या पिढीपर्यंत पोहचेल, असेही तिने सांगितले.
दही हंडी उत्सवात मराठी माणसांना एकत्र पाहून खूप आनंद होतो. आपल्याला कायम वाटतं मुंबईतून मराठी माणसं संपत चालली का? पण अशा उत्सवातून आपण एकत्र येतो. त्यामुळए असे उत्सव साजरे करणे गरजेचे आहे. दही हंडी हा आपल्या महाराष्ट्रातला मानाचा उत्सव आहे. आपल्या सगळ्यांच्या हृदयात त्याच्या आठवणी आहेत. मराठमोळ्या पद्धतीने साजरा होतो आहे, असेही तिने सांगितले.