OLA स्कूटर सुसाट; एकाच दिवशी 600 कोटींचे बुकिंग

ओला इलेक्ट्रिकच्या इलेक्ट्रिक स्कूटरने आतापासून आपला सुसाट प्रवास सुरू केला असून एकाच दिवशी तब्बल 600 कोटी रुपयांची बुकिंग मिळाल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावीश अग्रवाल यांनी दिली. कंपनीने नुकत्याच ‘एस 1’ या इलेक्ट्रिक स्कूटरची घोषणा केली होती. त्याच्या नोंदणीला बुधवापासून सुरुवात झाल्यानंतर दिवसभरात तब्बल 600 कोटींचे बुकिंग मिळाले. कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार प्रति सेकंदाला एकूण चार ‘ओला एस 1’ इलेक्ट्रिक स्कूटर विकल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारपासून सुरू केलेली नोंदणी गुरुवार मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या