शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदान शिबिर, महाआरोग्य शिबीर, शैक्षणिक साहित्याचे वाटप, गरजूंना मदत, अन्नदान, रुग्णांना फळ वाटप, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शाखा क्र. 222 चे उपविभागप्रमुख संपत ठाकूर आणि युवती सेना विभाग अधिकारी पायल ठाकूर यांच्या वतीने छत्री वाटप करण्यात आले. यावेळी उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजकुमार बाफना, विभागप्रमुख संतोष शिंदे, युगंधरा साळेकर, सरिता तांबट, विशाखा पेडणेकर, मंगेश सावंत, माधुरी पेंढारी, दिपन मोघे, रूपेश बोंबले, अभिजित देवरुखकर उपस्थित होते.
सुभाष डामरे मित्रमंडळ आणि शिवराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंद गावकर आणि संचालक सुधीर साळवी, संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोयबावडी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना चित्रकला साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला रवींद्र कुवेसकर, पराग चव्हाण, उर्मिला पांचाळ यांच्यासह नाना फाटक, कार्याध्यक्ष प्रभाकर मोरजकर, संतोष कांबळी उपस्थित होते.
शाखा क्र. 210 च्या वतीने शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांच्या उपस्थितीत वुमन वेलफेअर सोसायटी ऑफ द डायोसीज ऑफ बॉम्बे ऑल सेंट्स होम वृद्धाश्रमातील मातांना फळवाटप करण्यात आले. उपविभाग संघटक सोनम जामसुतकर, सूर्यकांत पाटील, सुहास भोसले, प्रमोद लाड, अमित जाधव, सुरेश चलवादी उपस्थित होते.
शिवसेना शाखा क्र. 22 तर्फे विभागप्रमुख अजित भंडारी, विभाग संघटक मनाली चौकीदार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुख प्रसाद पाटील, शाखा संघटक रेखा कदम यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात बिस्कीट, पॅडबरी आणि पाणी वाटप करण्यात आले. यावेळी संतोष राणे, शाम मोरे, प्रदीप वस्त, सीमा लोकरे, राजकुमार पवार, स्वप्नील निंबरे, महादेव कदम, किशोर कनोजिया, अमित मन्वाचार्य उपस्थित होते.