
सामना प्रतिनिधी । पुणे
बोगस अधिवास प्रमाणपत्र तयार करून त्यावर तहसीलदार कार्यालयाचा खोटा शिक्का, सही वापरून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी आणखी एकाला अटक केली.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भळगट यांनी त्याला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे. निखिल रत्नाकर दिवसे (रा. घोरपडे पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी यापूर्वी इरफान शेख (रा. कोंढवा खुर्द) याला अटक करण्यात आली आहे.




























































